मुक्ताईनगर । आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारार्थ वरिष्ठ पदाधिकार्यांनी प्रचाराची दमदार आघाडी घेऊन एक पाऊल पुढे टाकत विरोधकांना धूळ चारण्यासाठी विकासकामांच्या जोरावर निवडणुकीत लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यात गटानुसार कार्यकर्ता मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
आमदार एकनाथराव खडसे करणार मार्गदर्शन
त्यानुसार 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अंतुर्ली उचंदा गटाचा मेळावा पिंप्रीनांदू येथे तर मुक्ताईनगर-निमखेडी बुद्रुक गटासाठी दुपारी 4 वाजता निमखेडी बुद्रुक येथे, 26 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता कुर्हा वढोदा गटासाठी कुर्हा येथे तर दुपारी 4 वाजता चांगदेव-रुईखेडा गटासाठी निमखेडी बुद्रुक हायस्कूल येथे घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी आमदार एकनाथराव खडसे मार्गदर्शन करणार आहेत.
यांची राहणार उपस्थिती
यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, बोदवड बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरचिटणीस सतीश चौधरी, बी.सी. महाजन, संदीप देशमुख यांनी केले आहे.