नंदुरबार । भारतीय जनता पक्षाच्यावतीन रॅलीतून शक्तिप्रदर्शन करीत नगराध्यक्षसह नगरसेवक पदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रवींद्र चौधरी यांच्यासह 12 जणांनी नामांकन दाखल केले आहे. तर नगरसेवक पदासाठी 150 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सुरवातीला भाजपचे प्रभागातील उमेदवार आपल्या समर्थकांसह वाजत गाजत मोठा मारोती मंदिराजवळ आले. तेथून जलकाबाजार ,गणपती मंदिर मार्गे ही रॅली तहसील कार्यालयात गेली. या रॅलीत खा. हिना गावित,आ. विजयकुमार गावित, आ.शिरीष चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. रवींद्र चौधरी आदी सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात उमेदवांनी शक्तीप्रदर्शन दाखविलं.
या रॅलीत 19 प्रभागातील सर्वच उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे प्रमुख उमेदवार डॉ. रवींद्र हिरालाल चौधरी यांनी उमेदवारी दाखल केली. इतर पक्षातील 12 जणांनी नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे नामांकन दाखल करून निवडणुकीचा शंखनाद केला आहे. यामुळे यंदाची निवडणूक मोठ्या चुरशीची आणि तेवढ्याच प्रतिष्ठेची ठरणार आहे.
तळोदा । पालिका निवडणुकीच्या मानांकन पत्र दाखल च्या शेवटच्या दिवशी भाजपा व काँग्रेस पक्षातर्फे शहरात वाजत गाजत, रॅली काढत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. तळोदा पालिका निवडणुकीसाठी शुक्रवार 24 रोजी अर्ज दाखल शेवटची मुदत होती. भाजपा व काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली. भाजपातर्फे शहरातील दत्त मंदिर परिसरातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. यावेळी आ. उदेसिंग पाडवी, शहादा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,धुळे येथील भाजपचे प्रदीप कर्पे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय परदेशी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, प्रभाकर चौधरी, नितीन पाडवी, शहराध्यक्ष हेमलाल चौधरी, प्रदीप शेंडे, अनुप उदासी, आंनद सोनार, भाजयुमो शहराध्यक्ष हरीश साळुंके, ओबीसी सेल अध्यक्ष दीपक चौधरी शरद मिस्तरी, व सर्व उमेदवार त्यांचे समर्थक पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस पक्षातर्फे पक्ष संपर्क कार्यालय पासून शहरात रॅली काढण्यात आली. शहरात मेन रोड खान्देशी, काकशेठ मारुती गल्ली, आदी परिसरातून वाजत गाजत रैली काढली यावेळी माजी पालकमंत्री पद्माकर वळवी,जी प उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी नगराध्यक्ष भरत माळी, जिप माजी सभापती धनसिंग ठाकरे, जिप माजी सदस्य सतिष वळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, संजय माळी, दिवाकर पवार, प्रकाश ठाकरे, चेतन पवार पंस उपसभापती दिपक मोरे, योजना माळी नगराध्यक्ष रत्नाबाई चौधरी, गौरव वाणी सुभाष चौधरी, सतीवान पाडवी, आकाश वळवी सुरेश इंद्रजित नंदूगिर गोसावी, पं स सदस्य सीताराम राहासे, पंकज राणे, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय इमारतीमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते प्रचंड गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते
तळोदा भाजपातील जगदीश परदेशी विद्यमान नगरसेवक भाजपचे विवेक वंजी चौधरी, डॉ शशिकांत वाणी यांचे भासे भूषण येवले, दिवंगत पत्रकार मगन माळी यांचे चिरंजीव भाजप युवा मोर्चा चे निमेश माळी, यांनी उमेदवारी पत्र दाखल केले यांत भूषण येवले हे अपक्ष उमेदवारी करणार आहेत. तर नगरसेवक विवेक चौधरी, निमेश माळी व भाजप वकील आघाडीचे देवेंद्र पाटील यांच्या पत्नी देखील शिवसेने कडून उमेदवारी दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवारांकडून प्रचारास सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी सोशल मिडीयाचा जोरदार वापर सुरु आहे. तरुणांमध्येही निवडणूकीने उत्साहाचे वातावरण आहे. निवडणूक काळात गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे. नागरिकांना कोठेही राजकीय पक्षाच्या वतीने पैशाचा वापर केला जात असल्यास प्रशासनाला कळविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक खर्च ठरवून दिलेली आहे, त्या चौकटीतच खर्च करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पोटनिवडणूकीसाठी अर्ज
शहादा । येथील पालिकेच्या प्रभाग तीन ब च्या पोटनिवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून वसीम सलीम तेली यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी शेवटच्या दिवस अखेर 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत . या निवडणूकीत भाजपा व काँग्रेस पक्षाकडून एक ही उमेदवार दिला नाही. शहादा पालिकेच्या प्रभाग 3 ब मधून नगरसेवक सद्दाम तेली हे विजयी झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर ती जागा रिक्त झाली आहे. एक जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज दि. 24 रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस अखेर 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन एमआयएम पक्षाकडुन दोन उमेदवार आहेत. यात मयत सद्दाम तेलीचा भाऊ वसीम तेली व तज्ञाकडून मोहम्मद तर अपक्ष अब्दुल नईम अब्दुल अलीम मिस्तरी यांचा समावेश आहे. 30 नोव्हेंबर रोजी माघारी नंतर खरे चित्र स्पष्ट. होणार आहे. प्रभागात दोन हजार 812 मतदार आहेत. गुरुवार अखेर पर्यंत एमआयएम् पक्षाचे 2 व अपक्ष 1 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर भाजपा, काँग्रेस व् राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, कडून एकही उउमेदवार दिला नसल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. प्रभाग 3 ब ची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अजुन काही कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.