पाचोरा। केंद्र व राज्य सरकार जनतेकरीता व विशेषतः शेतकर्यांसाठी राबवित असलेल्या योजनेची माहिती मिळावी यासाठी भाजपातर्फे शिवार संवाद अभियान उपक्रम राबविले जात आहे. शनिवारी 27 रोजी पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे अमोल शिंदे यांनी शेतकर्यांशी व गावकार्यांशी थेट संवाद साधला. केंद्र सरकारच्या तीन आणि राज्य शासनाच्या अडीच वर्षाच्या काळात सरकारने शेतकर्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले त्याची माहिती त्यांनी उपक्रमातर्गत दिली.
तसेच शेतकरी व ग्रामस्थांची अडी अडचणी समजून घेतल्या. यावेळेस बन्सीलाल पाटील, पंचायत समिती सदस्य रविंद्र पाटील, राजू बापू पाटील, जितेंद्र पाटील, सकल्प ग्रुपचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.