भाजपातर्फे 2000 रोपांचे वाटप

0

धुळे । झाडे लावा झाडे जगवा हा पवित्र हेतु लक्षात घेवून भारतीय जनता पार्टी देवपूर पश्‍चिम मंडल आणि महाराणा प्रताप मराठी शाळा यांच्या सयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण आणि 2000 वृक्षवाटपाच्या कार्यक्रमाचे महाराणा प्रताप शाळेत आयोजन करण्यात आले होते. देवपुर पश्‍चिम मंडलात प्रभाग 4, प्रभाग 5, प्रभाग 6, प्रभाग 7 आणि प्रभाग 8 येथे एक घर एक झाड याप्रमाणे मंडलातील समस्त नागरिकांना त्यांच्या घरासमोर झाडे लावण्यासाठी 2000 रोपांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
यावेळी वृक्षारोपण आणि वृक्षवाटप कार्यक्रमात आयुक्त सुधाकर देशमुख , भाजपा गटनेत्या तथा नगरसेविका प्रतिभा चौधरी, रवि बेलपाठक, प्रशांत मोराणकर, किसन पाटील, भीमसिंग दादा राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. पवन खानकारी, निखिल सूर्यवंशी, वीणा शीसोदिया, दिनेश पाटील, डॉ. महेश घुगरी, विलास पाटील, सुनिल पाटील, मनोज शिरुडे,आदि मान्यवर यांनी देखील वृक्षरोपण आणि वृक्षवाटप केले. याप्रसंगी अमित भोसले, संजय ठाकुर, निशा चौबे, प्रशांत चौधरी, हितेंद्र पाटील, अमृता पाटील, सूरज चौधरी,पराग अग्रवाल, राकेश गर्दे, शेखर कुलकर्णी प्रितेश पाटील यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पर्यावरण संवर्धण करण्याची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.