गोंडा – केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात नाहीत. एवढेच नाही, तर इतर भाजप नेत्यांची मी अशाप्रकारे हमी घेऊ शकत नाही, असे विधान उत्तर प्रदेशातील गोंडा मतदार संघातील खासदार ब्रिजभूषण शरण यांनी केले आहे.
इतर नेत्यांबद्दल मी सागू शकत नाही
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात सामील नाहीत, केवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री योगी हेच प्रामाणिक आहेत. आमच्या पक्षातील इतर नेत्यांच्या बाबतीतही असेच असेल, असे नाही. ब्रिजभूषण यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही, काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची तुलना भुंकणाऱ्या कुत्र्यासोबत करून ब्रिजभूषण चर्चेत आले होते.