भाजपाने जपला बाबासाहेबांचा आदर्श

0

भुसावळ। महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर आतापर्यंत इतर पक्षांनी केवळ राजकारण केले. मात्र भाजपाने बाबासाहेबांचा आदर्श जपून लंडनमधील बाबासाहेबांचे निवासस्थान महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतले, इंदू मिलच्या जागेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन राज्य शासनास हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी वास्तव्य केले त्या जागांना स्मारकाचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे भाजपा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केले. भाजपा स्थापनादिनानिमित्त पंचायत समिती सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनिल नेवे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नेमाडे, सभापती सुनिल महाजन, उपसभापती मनिषा पाटील, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, गटनेता हाजी मुन्ना तेली, वसंत पाटील उपस्थित होते.

भीम अ‍ॅपद्वारे मिळणार कर्जाची सुविधा
याप्रसंगी प्रा. नेवे म्हणाले की, भाजपा स्थापना दिनापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान सामाजिक समरसता आठवडा राबविण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र व राज्यात असलेल्या भाजपा सरकारने दलीत व मागासवर्गीय समाजासाठी राबविलेल्या योजना या तळागाळापर्यंत पोहचवा, तसेच भीम अ‍ॅपद्वारे कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यात येत असून या अ‍ॅपच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांची तपासणी करुन नागरिकांना सरकार कर्ज सुविधा देणार आहे. त्यामुळे तालुक्यात 10 हजार अ‍ॅप इन्स्टॉल करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

चार विषयांसंदर्भात उपक्रम
यावेळी भाजपा स्थापना दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह, कॅशलेस व्यवहार या चार विषयांसंदर्भात उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी तालुक्यात जिल्हा परिषद गट व शहरात प्रभागनिहाय 4 भागात विभागणी करण्यात आली.

पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोहानिमित्त शहर व तालुका समिती गठीत करण्यात आली. शहर समिती संयोजकपदी हाजी मुन्ना तेली, सहसंयोजक वसंत पाटील, सदस्य खुशाल जोशी, दिपक धांडे, नारायण रणधीर, निलेश नेमाडे, अनिकेत पाटील, देवा वाणी, सुरेश कुटे, प्रशांत पाटील, राजू खरारे तर तालुका समितीत संजयोकपदी राजेंद्र चौधरी, सहसंयोजक सुनिल काळे, सदस्य प्रशांत पाटील, मुरलीधर पाटील, नारायण कोळी, समाधान पवार, किरण चोपडे, मिर्झा, रविंद्र पाटील, अरुण इंगळे, संजय पाटील, प्रकाश ठाकूर, संघरत्न सपकाळे यांची निवड करण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी बैठकीला महिला आघाडी अध्यक्षा शैलजा पाटील, अनुसुचित जाती आघाडीचे नितीन कोळी, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, पवन बुंदेले, भालचंद्र पाटील, वरणगाव नगराध्यक्ष अरुणा इंगळे, समाधान पवार, प्रमोद नेमाडे, दिपक धांडे, नारायण कोळी, अनुप खोब्रागडे, नगरसेवक गिरीष महाजन, किरण चोपडे, नगरसेविका लक्ष्मी मकासरे, प्रिती पाटील, नवलसिंग राजपूत यांसह शहर व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.