भाजपाने विश्‍वासघात केल्याने शिवसेनेला जाहीर पाठींबा

0

आरपीआयचे अनिल अडकमोल यांचे प्रतिपादन
जळगाव । आज आर.पी.आय.चे महानगर जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांनी आर.पी.आय.च्या वतीने शिवसेनेचे जेष्ठ नेते सुरेशदादा जैन व माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला. यावेळी शिवसैनिक, आर.पी.आय. चे पदाधिकारी व शकडो कार्यकर्ते हजर होते. यावेळी अनिल अडकमोल यांनी सांगितले की, भाजपाने आमचे व समाजाचे विश्‍वास घात केल्यामुळे आम्ही हा ठोस निर्णय घेतला आहे. आम्ही शिवसेना व शिवसेना पुरस्कृत उमेदवारांसोबत प्रभागवारी प्रचारमोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पक्षाला मानणारे सर्व स्नेहीजन शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी व शिवसेनेचे विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी कटीबध्द आहोत. याप्रसंगी जेष्ठ नेते सुरेशदादा जैन व शिवसैनिकांच्या वतीने आर. पी. आय. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी आर.पी.आय.चे जळगाव विभाग अध्यक्ष दिपक सपकाळे, जिल्हा सचिव भरत मोरे, युवा जिल्हा सचिव यशवंत घोडेस्वार, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, उपाध्यक्ष जळगाव विभाग अशोक पारधेसह सचिन अडकमोल, हरिष शिंदे, गौतम सपकाळे, पृथ्वी गायकवाड, रोहित गायकवाड, नरेंद्र मोरे, संदिप जोहरे व असंख्य आरपीआय व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.