भाजपाला लाज वाटली पाहिजे: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची सडकून टीका

0

मुंबई: आज दसरा निमित्त शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बिहारमध्ये भाजपने सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे, यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपची लाज आणि लायकी काढली आहे. भारतात फक्त बिहार हे एकमेव राज्य आहे का? , बाकीचे राज्य पाकिस्तानात आहेत की बांगलादेशमध्ये? असा सवाल उपस्थित करत घाणेरडे राजकारण करणाऱ्या भाजपला लाज वाटली पाहिजे असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

जीएसटी विरोधात सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र येण्याचे आवाहन

राज्याचा हक्काचा जीएसटीचा परतावा केंद्राकडे बाकी आहे. महाराष्ट्राचे 38 हजार कोटींची परतावा बाकी आहे. जीएसटी फसल्याने परतावा परत देतांना अडचण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जीएसटी रद्द करून पूर्वी प्रमाणेच कर प्रणाली लागू करण्यासाठी देशभरातील मुख्यमंत्र्यांनी एकत्र यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.