भाजपावर आ. सरनाईकांचा आरोप

0

ठाणे । मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने बहुमत मिळविले आहे.शिवसेनेची पिछेहाट झाली आहे.त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सारवासारव करित म्हणाले की,मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या प्रभागातील सर्व जागा सेनेने जिकल्या आहे.मात्र या भागात हिदी भाषिक, गुजराती, जैन मतदारांची संख्या जास्त आहे.त्यातुलनेत मराठी मतदार हा कमी आहे. पराभवानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या ओवळा-माजीपाडा विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मीरा-भाईंदरमध्ये येतो. भाजपाची राजकीय ताकत कमी पडल्याने त्यांनी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला असा आरोप त्यांनी केला. प्रचार संपल्यानंतर भाजपाने जैन धर्मगुरुंना प्रचारात उतरवल आणि त्यांचा संदेश जैन-गुजराथी समाजापर्यंत पोहोचवला असे सरनाईक म्हणाले.

आता तरी तुमचा अहंकार संपणार का?
उद्धव ठाकरे आता तरी तुमचा अहंकार संपणार का ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. मीरा-भाईंदरमधील मतदारांनी नरेंद्र मोदींच्या माफीया हटाव आणि मुख्यमंत्र्यांच्या विकासला मत दिल आहे. मुंबईत 84 जागा जिंकल्यानंतरही शिवसेनेची माफीयागिरी संपली नव्हती. मीरा भाईंदरचा निकाल हा शिवसेनेसाठी सणसणीत चपराक आहे. शिवसेना नेत्यांच्या अहंकाराला मतदारांनी जागा दाखवली आहे असे किरीट सोमय्या म्हणाले. मीरा-भाईंदरच्या निकालानंतर तरी बांद्रा सुप्रीमो वास्तव स्वीकारुन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा मान ठेवणार का ? असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.

भाजपाचा दणदणीत विजय
मीरा-भाईंदरकरांमधील मतदारांनी लाबाडाचे आमंत्रण नाकारले. पारदर्शी विकासाची हमी देणार्‍या भाजपाचा दणदणीत विजय करून स्वीकारले, या विजयाबद्दल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन केले आहे.मुंबईत दमछाक उडाली, पालघर, कल्याण-डोंबिवलीत आमच्यामुळेच अडले, पनवेलमध्ये भोपळाही फोडता आला नाही. तर मीरा-भाईंदरमध्ये पाचव्यांदा मतदारांनी उघडे पाडले. काहींच्या ताकदीचा अस्सली चेहरा आता समोर आला असेल, असे म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे.

इतर पक्षाचे सुपडे साफ
भाजपाच्या लाटेने इतर पक्षांचा सुपडा साफ केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतेय भाजपाने विजय मिळवला असून, मीरा-भाईंदर पालिकेत भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. पुन्हा एकदा भाजपाच मीरा-भाईंदरमध्ये पालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मोदी लाट इथेही कायम राहिली आहे.