शिरपूर । प्रदेशाध्यक्ष भाजपप्रणीत अनुसूचीत जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांच्या उपस्थितीत 19 रोजी जिल्हास्तरीय पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी होते. रहिमपुरे येथील दिनेश बेडसे या 22 वर्षीय तरुण सरपंचाचा सत्कार प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला. येणार्या काळात गांव तेथे अनुसूचीत जाती मोर्चाची शाखा स्थापन करु तसेच वंचीत घटकांना न्याय मिळवून देवू असे प्रास्ताविक करतांना जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार यांनी प्रतिपादन केले.
यावेळी यांची होती उपस्थिती
नवनिर्वाचित पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बैठकीस किशोर संघवी, विक्रम तायडे, संजय चंदने, गोरख बोराळे, गोविंदा थोरात, सखाराम अहिरे, ब्रिजलाल मोरे, गौतम आखाडे, प्रा.महेंद्र भामरे, धनराज मोरे, सागर महिरराव, स्वप्निल वाघ, राजधर अमृतसागर, जयंत सरदार, गौतम इंदासे, जी.बी.शिरसाठ, सी.के.महिरे, परशुराम पिंपळे, विजय अहिरे, राजेंद्र कढरे, जिवन पवार, सिध्दार्थ रामराजे, सचिन भामरे, धिरज कापुरे सूत्रसंचालन प्रा.महेंद्र भामरे तर आभार संजय चंदने यांनी मानले.