भाजपा आमदार राम कदमांनी राजीनामा द्यावा

0

शिवसेना व महिला आघाडीतर्फे निषेध व निवेदन

भुसावळ- लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणार्‍या भाजपा आमदार राम कदमांनी समाजाची माफी मागण्याऐवजी राजीनामा दयावा, अशी मागणी भुसावळ शिवसेना महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन निदर्शने करण्यात येवून प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

प्रांताधिकार्‍यांना निवेदन
शिवसेनेच्या जिल्हा संघटक पूनम बर्‍हाटे, भुसावळ विधानसभा क्षेत्र संघटक चंद्रकांता बोरसे, तालुका संघटक उज्ज्वला बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपतालुका संघटक जयश्री हातेकर, शहरप्रमुख भुराबाई चव्हाण, वासंती चौधरी, सरला रायजादे, पुष्पा खरे, लक्ष्मी खरे, अनिता पवार, हिराबाई पाटील, कांचन कुलकर्णी, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन, तालुका उपप्रमुख पप्पू भैय्या बारसे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख निलेश महाजन, बबलू बर्‍हाटे, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रा.विनोद गायकवाड, योगेश बागुल, नामदेव बर्‍हाटे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.