भाजपा खासदार मनेका गांधींचे एन्काऊंटरवर आक्षेप; कायद्याचा उपयोग काय?

0

हैदराबाद: हैदराबादमधील वेटरनरी डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्यावर पाशवी बलात्कार करून जाळून ठार करण्यात. यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी जनमानसात भावना व्यक्त होती. त्यानंतर आज सकाळी ज्या ठिकाणी बलात्कार झाला होता, त्याच ठिकाणी सर्व चारही आरोपींचे एन्काऊंटर करून ठार करण्यात आले आहे. जनमानसात आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पोलिसांचे कौतुक होत आहे. परंतु सरकार वकील उज्ज्वल निकम यांनी एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यानंतर आता भाजपच्या माजी मंत्री खासदार मनेका गांधी यांनी देखील एन्काऊंटरवर आक्षेप घेतले आहे. जे झाले ते भयानक आहे, कायदा हातात घेऊ शकत नाही. आरोपींना कोर्टाने फाशी दिली असती. कायद्याची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी त्यांना गोळ्या घालून ठार करणे योग्य नाही, असे होत असेल तर मग न्यायालये, कायद्याचा काय उपयोग? असा प्रश्न मनेका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याची खंत व्यक्त केली आहे. झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचे राज्य धोक्यात येईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.