चाळीसगाव : 8 नोव्हेंबर बूधवारी संध्याकाळी 5 वाजता चाळीसगाव तहसील कार्यालयाजवळ नोटा बंदीला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हा दिवस जनजागृती दिवस म्हणून साजरा केला. नोटाबंदीचे सर्वसामान्य लोकांना झालेले फायदे, अर्थव्यवस्थेला आलेली बळकटी, ऐतिहासिक, योग्य व कल्याणकारी निर्णयाची वर्षपूर्ती ऊत्साहात साजरी करण्यात आली.
चाळीसगाव तहसीलसमोर केली जनजागृती
याप्रसंगी भाजपा तालूकाध्यक्ष के.बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, विस्तारक प्रा.शशिकांत सूतार, सरचिटणीस प्रा.सूनील निकम, अॅड.प्रशांत पालवे, अमोल नानकर, यूवामोर्चा अध्यक्ष रोहन सूर्यवंशी, जि.प.सदस्य अनिल गायकवाड, सहकार आघाडी अध्यक्ष धनंजय मांडोळे, हर्षल चौधरी, जि.यू.मो.पदाधिकारी अमोल चव्हाण, व्यापारी आघाडी अमित सूराणा, अ.जा.आघाडी तालूकाध्यक्ष अभिषेक मोरे, अ.जा.शहराध्यक्ष सूबोध वाघमारे, प्रभाकर भाऊ , मानसिंग राजपूत, नगरसेवक बापू अहिरे, चिरागभाई, अरूण पाटील,राजेंद्र पगार, बंडू पगार, योगेश गव्हाणे, किशोर रणधीर, रवींद्र मोरे, अनिल चव्हाण, शहर युवा उपाध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा सदस्य अल्पसंख्याक बबडी शेख, सूभाष राठोड, अविनाश मोरे, शिवराज पाटील, अमोल चौधरी, गौरव पूरकर, सचिन आव्हाड, भरत गोरे, अॅड.भागवत पाटील, आण्णा कूमावत, नितीन राजपूत यांची उपस्थिती होती.