जळगाव- भाजपा जिल्हाध्यक्ष वाघ यांचे ड्रग्ज माफियांना संरक्षण असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज जळगावात केला. यासंदर्भातील एक व्हिडीओ क्लिप समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून वाळू माफियांच्या गाड्या सोडण्यासाठी फोन जात असून राज्यभरातील माफियांना भाजपचा आशिर्वाद असल्याचा आारोपही त्यांनी यावेळी केला.
काय आहे आरोप
एका केसमध्ये 116 किलो गांजा पकडण्यात आला होता. या केसमधून बाहेर काढण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांनी माझ्याकडून दहा लाख रूपये घेतल्याचे त्या गांजा विक्रेत्याने बयान दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. केस मागे न झाल्याने संबधिताने पैसे परत मागितले, मात्र त्याला पाच लाख देण्यात आले व पाच लाख न देऊन आम्ही तुला संरक्षण देण्याचे पैसे घेत असल्याचे उदय वाघ यांनी सांगितले. ही क्लिप समोर आल्यानंतर भाजपच्या आशिर्वादाने ड्रग्ज माफिया जिल्ह्यात काम करीत असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. याबाबत समोर आलेला व्हिडिओ शासकीय संस्थेकडून तपासून घेतला असून यामध्ये काहीच छेडझाड झालेली नाही याचे प्रमाणपत्र सुध्दा मलिक यांनी सादर केले. दरम्यान, उदय वाघ यांच्याविरोधात एसपी व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली असून जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. आदेशबाबा नशेखोर असून सार्या चिलम पिणार्यांची गर्दी व्हायची तेथे आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाला. ही सर्व परिस्थिती, जे काही गुन्हे, अत्याचार, अन्याय होताय या सार्या माफियांना सरकाचे संरक्षण असून त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती बिकट झाली असल्याचे नबाव मलिक यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
चौकशी व्हावी- खडसे
बीजेपी नितीमत्तेचे पालन करणारा पक्ष असून माझ्यावर साधा आरोप झाल्यावर मला राजीनाम द्यावा लागला. या विषयी तर पुरावे समोर आहेत, तर मग याची चौकशी करून राजीनामा घ्यावा, अशी प्रतिक्रिया माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. खडसे यांन समतानगरात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
** कोट **
राजकीय द्वेशातून हे आरोप आहेत. गांजा प्रकरणात ज्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर राष्ट्रवादी विश्वास ठेवते, राष्ट्रवादी हा गुन्हेगारांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. अवैध धंदे बंद करण्यासाठी आम्हीच आग्रही आहोत, याबाबत वारंवार आवाज उठविला आहे. हे राजकीय आरोप असून एक षडयंत्र आहे, याची चौकशी करावी.
– उदय वाघ, जिल्हाध्यक्ष भाजपा