भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे ना.भामरेंना निवेदन

0

धुळे । गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांगासाठी 3% राखीव निधी वितरित करण्यात आलेला नाही, त्यामुळे सदर निधीचे गरजू व दिव्यांग व्यक्तींना जीवन उंचावण्यासाठी वाटप होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार सदर निधी हा महानगरपालिका व ग्रामीण विभागात देखील अद्याप पर्यंत वाटप झालेला नाही, तसेच आमच्या माहितीनुसार धुळे महानगरपालिकेचा 3% निधी म्हणजेच रक्कम रुपये 21 लाख इतका दिव्यांग व्यक्तिंसाठी राखीव असून सदर निधीचे त्वरित गरजु व दिव्यांग व्यक्तींना वाटप होण्याकामी पुढील कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात येऊन सदर निधीचा योग्य तो लाभ संबंधित बांधवांना मिळवून देण्याकामी पुढील आदेश आपल्या स्तरावरून व्हावेत, असे निवेदन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.सुभाषजी भामरे यांना भाजपा दिव्यांग विकास आघाडीतर्फे देण्यात आले.

यांनी दिले निवेदन
निवेदन देतांना आघाडीचे प्रदेश चिटणीस महेश काटकर, अध्यक्ष सुनील घटी, उपाध्यक्ष दिनेश वाघ, यशवंत पाटील, भटूसूर्यवंशी, शितल चव्हाण, सुरेश ठाकरे, संजय टेंभेकर, कार्यसमिति सदस्य कविता पाटील, शंकर हरळ, हरीलाल पाटील, मयुर गायकवाड, एच आर लोहार आणि रवींद्र बोरसे, सतीष चांदणे, संतोष जाधव, अरुण पाटील, किशोर पाटील, अरुण अहीरे, नाना गुरव, सुरेश बोरसे, कोमल पाटील आदी दिव्यांग बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.