भाजपा नगरसेवकांचा सभात्याग

0

जळगाव । महासभेत भाजपा नगरसेवकांनी सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप करीत सभागृह त्याग केला. मनसेचे नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी बोलण्यास परवागी मागितली परंतु, महापौर ललित कोल्हे यांनी मिटींग सुरू होऊ द्या असे नगरसेवक नन्नवरे यांना सांगितले. या गोष्टीचा आपण निषेध करीत असल्याचे यावेळी नगरसेवक नन्नवरे यांनी सांगितले. दरम्यान, महापौरांनी सभागृहाचे कामकाज सुरू करण्याचे सांगितले. त्यानुसार प्रभारी नगरसचिव सुभाष मराठे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यास सुरूवात केली.

यांची होती उपस्थिती
महापालिकेची महाभसेचे आयोजन महापौर ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उपमहापौर गणेश सोनवणे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, प्रभारी नगरसचिव सुभाष मराठे उपस्थित होते. नगरसचिव मराठे विषय वाचत असतांना भाजपाचे नेते वामनदादा खडसे, रविंद्र पाटील, नवनाथ दारकुंडे, अनिल देशमुख, ज्योती चव्हाण यांनी त्यांना बोलू द्या अशी मागणी करत वेलमध्ये आले. भाजपा नगरसेकांनी गोंधळ घालत बोलू देण्याची मागणी केली.

भाजपा सदस्य झाले आक्रमक
नगरसेवक रविंद्र पाटील यांनी आम्हाला संधी द्या, इतिवृत्ताबद्दल बोलयचे आहे असे सभागृहात सांगितले. रविंद्र पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देत भाजपासदस्यांनी आपल्या जागेवर उभे राहत समर्थन केले. अनिल देशमुख यांनी त्यांना सभागृहात चर्चा करावयचे नाही असा आरोप करत त्यांच्या डेस्कवर ठेवलेले कागदपत्रक जोरात ठेवले. यावरून महापौर कोल्हे यांनी पत्रक फेकणार्‍यांवर कारवाई का करून नये अशी विचारणा केली. तर सभागृह नेते रमेश जैन यांनी सदस्यांनी बेशिस्त वर्तन न करात हात उंचवून परवानगी घेवून बोलावे असे आवाहन करत सभेनंतर चर्चा केली जाईल असे सांगितले. यावर भाजपा नगरसेवक रविंद्र पाटील यांनी विषय मंजूर झाल्यावर चर्चचा काय फायदा असा प्रश्‍न उपस्थित केला.

कारवाईचा ठराव
भाजपा नगरसेवक बोलत असतांना महापौरांनी नगरसचिवांना अजेंडावरील विषय वाचण्याची सूचना दिली. रविंद्र पाटील यांनी आम्हाला दोन महिन्यापूर्वी सभागृहात जमीन आरक्षणात झालेल्या चर्चेनुसार समिती गठीत करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते त्यानुसार कारवाई झाली नसल्याचा आरोप केला.आपले काही ऐकले घेतले जात नसल्याचे पाहून भाजपासदस्यांनी सभात्याग केला. देशमुख यांनी आपल्या डेस्कवर कागदपत्रे जोरात ठेवल्याने त्यांचावर कारवाईचा ठराव महापौर यांनी मांडला. हा ठराव एकमताने मंजूर झाला.