भाजपा नगरसेवकावर मारहाणीचा गुन्हा दाखल

0

नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी केली पर्ववैमनस्यातून मारहाण

पुणेः आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्याविरुध्द सहकारनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुर्ववैमनस्यातून त्यांनी एकास मारहाण केली आहे.नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, अनंत तंवर, गिरीश क्षीरसागर,निलेश देगावकर(सर्व रा.धनकवडी) अशी आरोपींची नावे आहेत.

आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण
पोलीसांनी दिलेल्या माहिती नूसार ही घटना शनिवारी रात्री शंकरमहाराज मठासमोर घडली. याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते शैलेद्र प्रभाकर दिक्षीत यांनी फिर्याद दिली आहे. तर शैलेश दिक्षीत यांच्याविरुध्दही कर्मचार्‍यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल आहे. दिक्षीत हे शनिवारी रात्री शंकर महाराज मठासमोर आले असताना, त्यांना नगरसेवक शिळीमकर यांनी मारहाण केली. लाथाबुक्कयाने, बांबुने आणी दगडाने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिळीमकर यांच्यासह धनकवडी येथील आणखी तिघांवर गुन्हा दाखल आहे.

दिक्षीत यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी
तर शैलेद्र दिक्षीत यांच्यावर शंकर महाराज मठासमोरील 20 रुपयांत पोटभर जेवण या स्टॉलवरील कामगाराला शिवीगाळ केली होती. याचा जाब आनंद तौर यांनी विचारला असता त्यांनी तौरला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. यामुळे दिक्षीत यांच्याविरुध्द अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक शिळीमकर हे मागील काही वर्षापासून शंकर महाराज मठ येथे 20 रुपयांता पोटभर जेवण हा उपक्रम राबवतात. याप्रकरणी अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.