भाजपा नगरसेवक पालिकेस आज ठोकणार टाळे

0

धुळे । शहरातील पेठ विभागामध्ये गटारी रस्ते,पथदिवे या नागरीसुविधांच्या नावाने बोंब असून महापालिका समस्या सोडविण्यामध्ये कुचकामी ठरली आहे. महापालिकेच्या आश्‍वासनावर आमचा भरवसा नाही. असे म्हणत भाजपा उद्या महापालिकेला टाळे ठोकणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या पेठ विभागाने गेल्या वर्ष दीड वर्षापासून नागरी सुविधा सोडविण्यासंदर्भात रस्ते, पथदिवे, गटारींच्या नावाने पेठविभागात बोंब महापालिका कुचकामी, भाजपा उद्या टाळे ठोकणार महापालिकेला अनेकदा निवेदने दिली, आंदोलनेही केली. मात्र प्रशासनाने कोणतही दखल घेतलेली नाही. दि.25 फेब्रुवारी रोजी मनपाचे उपायुक्त रविंद्र जाधव यांना घेराव घालून निवेदन दिले. पेठ विभागातील गटारी रस्ते,पथदिवे अनियमित पाणीपुरवठा महिलांसाचे शौंचालय,पार्किंगची समस्या यावर उपाययोजना करण्याची मागणी केली.

वारंवार पाठपुरावा करूनही समस्या जैसे थे
महापालिकेला वेळोवेळी कर भरुन देखील मनपा प्रशासन सुविधा पुरवित नाहीत.त्यामुळे उद्या दि.7 रोजी टाळे ठोक आंदोलन करु असा इशारा उपायुक्त जाधव यांना दिला होता. समस्या लवकरात लवकर सोडवू असे पत्र दि.2 मार्च रोजी महापालिकेने दिले. मात्र प्रशासनाच्या आश्‍वासनाला बळी न पडता भाजपा आंदोलन करणारच असा निर्धार पदाधिकार्‍यांनी केला आहे. उद्या दि.7 रोजी महापालिकेला टाळे ठोकण्याचा निर्धार भाजपाने केला असून उद्याच्या आंदोलनात पेठ विभागाचे अध्यक्ष जितेंद्र धात्रक, शिरीष शर्मा, तुषार भागवत, अमोल मराठे, विजय गवळी, ओम खंडेलवाल, सचिन शेवतकर, सागर कोडगीर, गणेश बनछोड, सागर लाड, विजय सोनवणे, राहुल बागुल, मोहम्मद अन्सारी, संजय तारगे, सचिन रुणवाल, विनोद जगताप, भटू चौधरी, मंगलाबाई कवडीवाले, गुलाबबाई तारगे, वंदना धात्रक, सुमती भागवत आणि पेठ विभागातील नागरीक सहभागी होणार आहेत.असे पत्रक जितेंद्र धात्रक यांनी प्रसिध्दीस दिले आहे