कृषीपंप वीज धोरणांतर्गत माजी आमदार अरुण पाटील यांचा ऊर्जा विभागा तर्फे सन्मान
नगराध्यक्षांकडून दोन मागण्यांना मंजुरी : उर्वरीत मागणीही होणार असल्याचा दावा
रावेर : कृषी पंप वीज धोरण अंतर्गत एक जागरूक वीज ग्राहक म्हणून माजी आमदार अरुण पाटील यांचा राज्य विद्युत वितरणतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्वव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातुन लाईव्ह सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कृषी वीज जोडणी धोरण 2020 मध्ये माजी आमदार अरुण पाटील हे एक जागरूक ग्राहक म्हणून कृषीपंप वीजमध्ये सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार यांनी पाच लाख 5 हजार 100 रुपये वीज बिल भरले आहे. हा कार्यक्रम ऊर्जा विभागा तर्फे महाराष्ट्रभर ऑनलाइन होता. या कार्यक्रमाला फेसबुकच्या माध्यमातुन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे लाईव्ह होते.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रम होताच महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गीते यांचे सन्मानपत्र माजी आमदार अरुण पाटील यांना देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता गौरक्षनाथ सपकाळे (सावदा), उप कार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांच्या सह कक्ष अभियंते आदी उपस्थित होते. कोरोना व्हायरस प्रभाव लक्षात घेता असला या कार्यक्रमाला मोजकेच शेतकरी उपस्थित होते.