भुसावळ : शिवसेना उपनेते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथील कार्यक्रमात कव्वाली गात रसिकांना मंत्रमुग्ध केले होते मात्र या संदर्भात भाजपा नेते निलेश नारायण राणे यांनी अत्यंत शिवराळ भाषेत ट्विट करून पालकमंत्र्यांचा अपमान केल्याने राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भुसावळ शहर शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांच्या नेतृत्वात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक मंगेश गोंटला यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या
राणे यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वच शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून निलेश नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी शिवसैनिकांनी भूमिका मांडली. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनावणे, माजी तालुकाप्रमुख नीळकंठ फालक, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, तालुका युवा अधिकारी हेमंत बर्हाटे, शहर युवा अधिकारी सुरज पाटील, उपशहरप्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक सोनी ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, अॅड.निर्मल दायमा, विक्की चव्हाण व शिवसैनिक उपस्थित होते.