भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या प्रतिमेस चपलांचा हार

0

चोपडा । भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकार्‍यांविषयी तूर खरेदी बाबत शिवीगाळ केल्या प्रकरणी रावसाहेब दानवे प्रतिमेस दुपारी 12.00 वाजता शिवाजी चौकात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मार्फत चपलांचा हार घालुन निषेध करण्यात आला. त्यानंतर चोपडा तहसील कार्यालयात जाऊन चोपडा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आणि चोपडा शहर पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना संयुक्तिक रित्या निवेदन दिले.

निवेदन देताना यांची होती उपस्थिती
यावेळी अमृतराज सचदेव, ज्येष्ठ शिवसैनिक दीपक सिंग जोहरी, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहर प्रमुख तथा नगरसेवक महेंद्र धनगर, नगरपालिकेचे गटनेता महेश पवार, राजाराम पाटील, किशोर चौधरी, आबा देशमुख, जगदीश मराठे, जिल्हा परिषद सदस्य हरिष पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, एम.व्ही.पाटील, रहीम बागवान, वासुदेव महाजन, प्रदीप बारी, दीपक माळी, मुखत्यार मिस्री, धीरज गुजराथी, रुपेश भालेराव, विक्की शिरसाठ युवा सेना उपजिल्हा प्रमुख दीपक चौधरी, सुकलाल कोळी, वासुदेव महाजन, सुनील बर्डिया, अजय राजपूत, दीपक माळी यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.