भाजपा बहुमत सिद्ध करणार नाही; सरकार बनवू :शरद पवार

0

मुंबई: शरद पवार, उद्धव ठाकरे, यांची वाय.बी.सेंटर येथे पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसच्या नेत्यांनी गैरहजेरी होती. अजित पवार यांचा निर्णय पक्षाविरोधात भूमिका घेतली असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भाजपा सोबत जाणारा नाही, तसेच जे अजित पवार यांच्यासोबत गेले त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वसामान्य माणूस अजित पवार यांच्यासोबत जाणार नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे १० ते ११ आमदार अजित पवारांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील जनतेच्या भावना भाजपा विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, शरद पवार, उपस्थित होते. अजित पवार यांनी पक्ष कार्यालयातून ५४ आमदारांची यादी काढत ती राज्यपालांन दाखवण्यात आली असल्याचे सांगितले. भाजपा बहुमत सिद्ध करू शकणार नाही असा दावा त्यांनी केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सोबत असल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्राने महाराष्ट्रवर सर्जिकल स्ट्राईक केली असून, याविरोधात आम्ही एकत्र लढू असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आमची लढाई भाजपाच्या ‘मी’पणा विरोधात असून, यापुढे लढत राहूअसे सांगितले. अजित पवारांवर कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असा उल्लेख शरद पवारांनी बैठकीत केला.