जळगाव । जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवार 17 मे 2018 गुरुवार रोजी भाजपा जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे सकाळी 11 वाजता भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ट दीपकजी घाणेकर यांचे हस्ते जिल्हा रुग्णालयातील 200 रुग्णांना अन्नदान करण्यात आले. यावेळी भाजपा जळगाव महानगरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
मनपा गटनेते सुनील माळी, जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, राजेंद्र घुगे, बापू ठाकरे, वंदना पाटील, मनोज भांडारकर, नगरसेवक ज्योती चव्हाण, उज्वला बेंडाळे, नवनाथ दारकुंडे, प्रकाश बालानी, नितीन पाटील, किशोर बाविस्कर, मंडल अध्यक्ष राजू मराठे, कपिल पाटील, राहुल पाटील, राहुल वाघ, अरविंद देशमुख, आशिष वाणी, दत्तात्रय जाधव, गणेश माळी, भगवान सोनवणे, ज्योती निंभोरे, सर्जेराव बेडीस्कर, रेखा पाटील, स्नेहा निभोरे, तृप्ती पाटील, योगेश बागडे, भूपेश कुलकर्णी, वैभव चौधरी, आनंद सपकाळे, रिंकू चौधरी, प्रकाश पंडित, दिशांत दोषी, पांडुरंग कोळी, तेजस जोशी, नितीन पाटील, आदी उपस्थित होते.
45 मुलांची केली तपासणी
सकाळी 11.30 वा. आमदार सुरेश भोळे व जी.एम.फाऊंडेशन यांच्यावतीने हृदयाचे व्हॉल व हृदय रोग पिडीत असलेल्या लहान मुलांची मोफत तपासणी प्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ.अजय भदावर यांनी 40 ते 45 मुलांची तपासणी केली व त्यांना पुढील मोफत उपचार व शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. सदर शिबिरास नव्याने निर्मित होत असलेल्या मेडीकल कॉलेजच्या मेट्रन अगस्ती घोले, सिस्टर नानी वडेकर, राहुल पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.