भाजपा महापालिकांमध्ये पटीने वाढला

0

मुंबई । मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा सेनेने जिकून मोठा पक्ष ठरला आहे.मात्र शेवटच्या टप्प्यात भाजपाने जोरदार मुंसडी मारली की सेनेच्या जवळपास येवून थांबले. त्यामुळे आपणच मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे. 227 जागांपैकी 227 जागांपैकी भाजपने 81 जागांवर विजय मिळवला असून, चार अपक्षांसह सर्वाधिक 85 जागा जिंकल्याचा दावा भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. मुंबई महापालिकेत शिवसेनेने 84, भाजप 81, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, एमआयएम 3 , स.पा 6 , अखिल भारतीय सेना 1, अपक्ष 4, निवडून आले आहेत.भाजपच्या जागा वाढताच आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाचा व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा असल्याचे म्हटले आहे.

शिवसेना-काँग्रेसचे मॅच फिक्सिंग
शिवसेनेची वाढ ही शाळेतील मुलांच्या फूटपट्टीएवढी आणि भाजपची वाढ ही काही पटींमधली असल्याचे शेलार म्हणाले.40 जागा जिंकण्याची औकात नाही असे भाजपला म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक देत मुंबईकरांनी 81 जागा भाजपाच्या पारड्यात टाकल्या…! असे ट्विट शेलार यांनी केले आहे.अपक्ष नगरसेवकांपैकी रहेबर राजा खान यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला. तसेच शिवसेना-काँग्रेसने मॅच फिक्सिंग करुनही भाजपला यश मिळाल्याचे शेलार म्हणाले.आमचा हा दणदणीत विजय आहे. हा विजय मुंबईकरांना सुपूर्द करतो. मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाचा हा विजय आहे. भाजपने 32 वरुन 82 जागांपर्यंत मजल मारली आहे.