जळगाव । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अर्थमंत्री सुंधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थकसंकल्प हा प्रगतिशील शासनाच्या कलपना असणार असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत केले. याप्रसंगी जळगाव शहर महानगराध्यक्ष तथा आ. राजुमामा भोळे, विशाल त्रिपाठी, सुभाष शौचे, मनोज भांडारकर, राजू पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी राज्य अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असल्याचेही श्री. वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोअर कमेटी गठीत
पत्रकार परिषदेनंतर अनौपचारिक बोलतांना उदय वाघ यांनी शहराचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचा पुर्नउल्लेख केला. यासंदर्भांत पक्ष कामाला लागला असून आ. राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमेटी गठीत करण्यात आले असल्याची माहिती श्री. वाघ यांनी सांगितले. भाजपाने मनपा निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. तसेच 17 मार्च रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, मंडळाध्यक्ष, जि.प. सदस्य, खासदार, आमदार, विविध पदाधिकार्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
खासदारकीपदाची दावेदारी
माजीमंत्री तथा जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांना राज्यसभेवर संधी दिल्यास हा जिल्ह्याचा सन्मान असेल असेही श्री. वाघ यांनी स्पष्ट केले. नाथाभाऊंचा पक्षातर्फे योग्य त्या ठिकाणी विचार करण्यात येईल अशी पुस्ती श्री. वाघ यांनी जोडली. श्री. वाघ यांना खासदारपदाची निवडणूक लढविण्याबाबत विचारणा केली असता हा फक्त साधुसंतांचा पक्ष नसून अशी महत्त्वाकांक्षा ठेवणे चुकीचे नसल्याचे सांगून आपणही खासदारकीच्या रेसमध्ये असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.
जि.प.सदस्यांमध्ये नाराजी नाही
जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदरसंघात भाजपा उमेदवार देण्याची तयारी असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजी नसून जिल्हा परिषद अध्यक्षांचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे श्री. वाघ यांनी स्पष्ट केले. तसेच ही बाब पक्षांतर्गत असून यावर संघटनात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही श्री. वाघ यांनी सांगितले.