भाजपा महिला मोर्चातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम

0

जळगाव । आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी तळागाळातील वंचीत महिला घटकांपर्यत पोहचण्यासाठी आणि महिलांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हळदीकुंक कार्यक्रमानिमित्ताने समाजातील वंचीत महिला घटकांपर्यत बचत गटाची संकल्पना पोहचावी आणि बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभारणी होऊन महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महिलांना बचत गटाबद्दल माहिती देण्यात आली.

योजनेविषयक माहिती पुस्तिकेचे अनावरण
यावेळी ‘अस्तित्व’ या महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. तसेच महिला बचत गटासाठी सदस्य नोंदणी देखील करण्यात आली. यावेळी भाजपा सरकार महिलांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषद निवडणूकीत सर्वाधिक जागा महिलांसाठी राखीव असल्याने निवडणूकीत महिलांची उमेदवारी अधिक असणार आहे. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला कार्यकर्त्याशी संवाद साधुन निवडणूकीबद्दल चर्चा करण्यात आली. शासनातर्फे महिला आणि मुलींसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्षा जयश्री पाटील, रेखा कुलकर्णी, भाग्यश्री चौधरी, उषा पाठक, सना खान, संगिता निकम, संगिता पाटील, छाया पाटील, नितू परदेशी, कविता सपकाळ, निर्मला सपकाळ आदी महिला उपस्थित होत्या.