चाळीसगाव । भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहराध्यक्षपदी डॉ. ज्योती पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. आमदार उन्मेश पाटील यांच्या संपर्क कार्यालयात महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शैलजाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यावेळी त्यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील यांनी भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षपदी त्यांची पत्राद्वारे नियूक्ती केली. तसेच तालूकाध्यक्ष के.बी.साळुंखे यांनी संगीता रमेश सोनवणे यांची महिला मोर्चा तालुका सरचिटणीसपदी निवड करून याबाबचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी यांची होती उपस्थिती
या प्रसंगी तालूकाध्यक्ष के.बी.साळूंखे व महिला मोर्चा अध्यक्ष नमोताई राठोड यांनी तालुका कार्यकारणी घोषित केली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी लताताई चौधरी, तालुका संघटन सरचिटणीस प्रा.सूनील निकम, सरचिटणीस अनिल नागरे, धनंजय मांडोळे, शहर सरचिटणीस अॅड.प्रशांत पालवे, अमोल नानकर, सूनील पाटील, रवींद्र पाटील, शेषराव चव्हाण आदी उपस्थित होते.