शिरपूर। भारतीय जनता युवामोर्चा शिरपूर तालुकाध्यक्षपदी वाघाडी येथील सुनिल शालिकराव माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याशी विचारविनिमय करुन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी तालुक्यातील वाघाडी येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते सुनिल माळी यांची नियुक्ती केलेली आहे. ते शिरपुर माळी समाज युवा महासंघ तालुकाध्यक्ष तसेच महात्मा फुले समता परिषद तालुकासंपर्क म्हणुन कार्यरत आहेत.
त्यांचा नियुक्तीचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे,रोहयो मंत्री ना.जयकुमार रावल,खा.डॉ.हिना गावीत, आ.अनिल गोटे, उत्तर महाराष्ट विभाग संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर,जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी आदींनी अभिनंदन केले. सुनिल माळी यांना धुळे येथे नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी, सरचिटणीस अरुण धोबी, उपाध्यक्ष किशोर माळी, चिटणीस संजय आशापुरे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.