भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी धमाणी

0

साक्री । भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी शिरपुर येथील दिलीप दौलत धमाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिलीप दौलत धमाणी यांची नियुक्ती केलेली आहे. दिलीप धमाणी यांनी पक्षाच्या वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. त्यांच्या नियुक्तीचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे,रोहयामंत्री जयकुमार रावल, खा.डॉ.हिना गावीत, आ.अनिल गोटे, अ‍ॅड.किशोर काळकर, लक्ष्मण सावजी, किशोर सिंघवी, वसंतराव बच्छाव,कामराज निकम, अरुण धोबी आदींनी अभिनंदन केले.

याप्रसंगी किशोर माळी, संजय आशापुरे, चंद्रकांत पाटील, आबा धाकड, हेमंत पाटील,प्रशांत चौधरी, राधेश्याम भोई,अविनाश शिंपी,हेमराज राजपुत जयवंत पाटीलरविद्र भोई,नंदू माळी,मुबीन शेख,जाकीर तेली,अरमान मिस्तरी,विक्की चौधरी आदी उपस्थित होते.