भाजपा शिष्टमंडळाची आयुक्तांच्या समर्थनार्थ भेट

0

कल्याण : दोन दिवसापूर्वी विकास कामे होत नसल्याच्या आरोप करत शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त दालनात राडा केला होता.

याबाबत भाजपने इतकी वर्षे सत्तेत असलेल्या सेनेने विकास कामे होत नसल्याबाबत आयुक्त दालनात गोंधळ घालणे आणि आयुक्त भाजपची कामे करतात हा आरोप हास्यास्पद असल्याचे सांगत आज भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने गटनेते वरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयुक्तांच्या निर्णयाचे आपण स्वागत करत असल्याचे स्पष्ट केले.

दोन दिवसापुर्वी शिवसेनेच्या सुमारे 25 नगरसेवकांनी आयुक्त दालनात गोंधळ घालत प्रशासनाकडून विकास कामाच्या फाईल्स रखडवल्या जात असल्याचे तसेच बिले देखील वर्षभराहुन अधिक काळ रोखून धरली जात असल्याचा जाब आयुक्तांना विचारला होता तसेच शिवसेना नगरसेवकांना डावलून भाजपच्या नगरसेवकांची कामे मात्र तातडीने होत असल्याचा आरोप केला होता यानंतर आयुक्तांनी आत्यावश्यक कामे मार्गी लावण्या बरोबरच नगरसेवक निधी सर प्रभागात सारखा देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यांनतर काही तासातच गोंधळी नगरसेवका विरोधात पालिका प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेने केलेलेआंदोलन चुकीचे असून आयुक्तांना पालिकेतील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी वेळ देण्या आधीच त्यांच्या विरोधात आंदोलन छेडने कसे चुकीचे आहे याचा पाढा वाचत आयुक्तांच्या निर्णयाचे भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने समर्थन केले .यानंतर गटनेते वरून पाटील यांनी महापालिकेतील सर्व महत्वाची पदं सेनेकडे असतानाही शिवसेनेचे आंदोलन म्हणजे एक प्रकारे प्रशासनावरील दबावतंत्र आहे. कामं होत नाहीत म्हणून प्रशासनावर, आयुक्तांवर आपला असंतोष काढायचा हा सेनेचा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतू आयुक्त नविन आहेत त्यांना शहराची परिस्थिती समजून घेण्यासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे सांगत भाजप पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले .दरम्यान केल्यानंतर सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजपाने याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न चालविल्याने पुन्हा एकदा शिवसेना भाजपा मधील वाद उफाळून आले आहेत.