भाजपा सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध

0

धुळे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्षम नेतृत्व विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर भाजपाने सुडबुद्दीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या निषेधार्थ धुळे येथे भव्य निदर्शने करण्यात आली. गोरगरीबांचा आवाज विधान परिषदेत मांडणारे व सरकारचा भोंगळ कारभारावर अंकुश ठेवणार्‍या नेतृत्वावर भाजपा सरकारने बदनाम करण्याच्या उद्देशाने धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे बिनबुडाचे ना.धनंजय मुंडेंवर भाजपाने केलेल्या आरोपाचा निषेध आरोप केले ते महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात विरोधीपक्ष नेत्यांवर झालेला हा निंदनीय प्रकार आहे. असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

हे होते निदर्शनकर्ते
याबाबत भाजपा सरकारने वेळीच माफी न मागीतल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस तिव्र स्वरुपाचे आंदोलन करेल असे राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे धुळे जिल्हा शहर अध्यक्ष कुणाल संजय पवार यांनी म्हटले. यावेळी भोला सैंदाणे, निलेश गवळी, राजदीप काकडे, पंकज गवळी, राहूल नावरकर,राहूल सोनवणे, सुयोग मोरे, सनी मोरे, दानिश मन्सुरी, सनी भापकर, विश्‍वजीत पाटील, मयुर पाटील, मयूर बोरसे, आकाश शिंदे, निलेश धुमाळ, शुभम गिरासे, लिलाधर गोसावी, वैभव गोसावी, ललीत गोसावी, किरण पाटील, नितीन पाटील, हर्षल गावडे, स्वप्नील पाटील, अजय गर्दे आदी उपस्थित होते.