भाजपा सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यत पोहचवा

0

रावेर। पक्षाच्या स्थापनेनिमित्त होणार्‍या कार्यक्रमात भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी रावेर येथील भाजपाच्या कार्यक्रमात केले. येथील बाजार समिती सभागृहात माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची तालुका बैठक झाली. यामध्ये येणारा भाजपा स्थापना, पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मदिन शताब्दी वर्षनिमित्त वर्षभर राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, जिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, जिल्हा परिषद सदस्या नंदा पाटील, रंजना पाटील, कैलास सरोदे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, भाजपा सरचिटणीस वासु नरवाडे, महेश चौधरी, शिवाजीराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य महेश पाटील, गोपाळ नेमाडे, अलका चौधरी, अमोल पाटील, प्रल्हाद पाटील, संदिप सावळे, सरपंच श्रीकांत महाजन, हरलाल कोळी, प्रमोद धनके, पितांबर पाटील, यशवंत दलाल, मनोज श्रावग, अ‍ॅड. प्रविण पाचपोहे, विश्‍वास चौधरी, लक्ष्मण महाजन आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते
उपस्थित होते.

यांनी मारली दांडी
रावेर येथे भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आणि पंडीत दिनदयाल जनशताब्दी वर्षानिमित्त होणार्‍या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भातील महत्वाची बैठक मंगळवार 4 रोजी झाली. यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी शासनाच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन करुन स्थापना दिन कार्यक्रमाचे नियोजनाबाबत सुचना केल्या. मात्र पंडीत दिनदयाल जन्म शताब्दी संयोजक पदाची जबाबदारी असलेले आमदार हरिभाऊ जावळे तसेच पंचायत समिती उपसभापती अनिता चौधरी, पंचायत समिती सदस्या कविता कोळी, योगिता वानखेडे, धनश्री सावळे, पी.के. महाजन आदी लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्याने पक्ष व संघटनेच्या जोरावर निवडून आलेल्यांना पक्ष स्थापनेचा मात्र विसर पडला.