भाजपा सरकारने केलेल्या विविध योजनांची वरणगावात जनजागृती

0

वरणगाव– 15 वर्षांपासून त्रस्त झालेल्या महाराष्ट्रात तीन वर्षांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वा खाली भाजपा सरकारने लक्षणीय प्रगती करून महाराष्ट्र नंबर एक बनवल्याने त्या संदर्भात वरणगावात कार्यकर्त्यांनी जनजागृती केली. या जनजागृतीमध्ये नागरीकाच्या दृष्टीकोनातून कृषी जलयुक्त शिवार योजना, गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, रोजगार निर्मिती करीता वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गटप्रकल्प योजना, महिला व बाल विकासासाठी अस्मिता योजना, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, माझी कन्या भाग्यश्री योजना, विद्यार्थी व शिक्षण योजना राजे श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, डॉ पंजाबराव देशमुख वस्तीग्रह भत्ता, जात प्रमाणपत्र पडताळणी यासह विविध योजनांबाबत जनजागृती पत्रक वाटून जनागृती करण्यात आली. यावेळी सुधाकर जावळे, इप्तेखार मिर्जा, बबलू माळी, महेश सोनवणे आदी उपस्थित होते.