चाळीसगाव : नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकर्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पंतप्रधानांनी सर्व सुरळीत करण्यासाठी पन्नास दिवसाचे मुदत मागीतले होते. परंतु पन्नास दिवस उलटल्यानंतरही परिस्थिती तशीच आहे. भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी असून भाजपा सरकारने देशाच्या जनतेची फसवणूक केली आहे. असे मत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतिष पाटील यांनी चाळीसगाव येथे पक्षातर्फे आयोजित तालुका मेळाव्यात व्यक्त केले. आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या संदर्भात चाळीसगाव तालुक्यातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सात गट 14 गण
चाळीसगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट असून पंचयत समितीचे 14 गण आहे. सर्वच गटात राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार निवडणूक लढविणार असून उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकार्यांनी जोमाने कामाला लागावे असे आदेश देण्यात आले. माजी आमदार राजीव देशमुख यांनी नगरपालिकेच्या निवडणूकीत सत्ता जरी मिळाली नसेल तरी 45 टक्के मते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला मिळाले असल्याने खचुन जाण्याचे काही कारण नसुन आगामी निवडणूकीसाठी जोमाने काम करावे असे कार्यकर्त्याना सांगितले.
तालुका विकासापासून वंचीत
गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषेत भाजप शिवसेनेची युती सत्तेत असून त्यांच्याकडून कोणतेही विकास कामे झालेले नाही. चाळीसगाव तालुक्यात केंद्र शासनाची योजना नाही, वरखेड धरणाचे काम बंद पडले आहे, बेलगंगा चालू करण्याची नुसती घोषणा केली अद्यापही सुरु झालेले नाही. तालुक्यात रस्ते विकास यात्रा निघते मात्र बस सेवा बंद आहे. नोटाबंदीला 65 दिवस पूर्ण झाले असल्यावरही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नसल्याची टिका यावेळी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी यावेळी खलील देशमुख, शशिकांत साळुंखे, आशालता साळुखे, योगेश देसले, विकास पवार, छाया महाले, किशोर पाटील, मंगेश राजपूत, रामचंद्र जाधव, दिनेश पाटील, प्रमोद पाटील, वाय.एस.महाजन, बाजीराव दौड, सुभाष चव्हाण, शेनफडू पाटील, सुभाष जैन यांसह राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन कल्याण पाटील यांनी केले.