मुंबई । निवडणुका जाहीर झाल्यापासून शिवसेना-भाजपा यांच्यात भांडणे सुरू आहेत. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाशी मुंबईकरांचा काहीही संबंध नाही. मुलगा अमित आजारी असल्यामुळे प्रचाराला उशिरा सुरुवात केली. पण मी नसताना पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली, त्यांचं अभिनंदन करतो. शिवसेना आणि भाजपाच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यरोपावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांची तुलना कोंबडीच्या झुंजीशी केली आहे. निवडणुकीनंतर हे पुन्हा एकत्र येतील, असा टोला राज ठाकरे यांनी सेना भाजपावर लगावला. दरम्यान आज राज ठाकरे यांनी दिव्यात खासगी मैदानावर सभा होणार असल्याची माहीती समोर आली आहे.
मोदींच्या नोटाबंदीचाही घेतला समाचार
मोदींच्या नोटाबंदीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, एक नवा भारत तयार होईल. नोटाबंदीनंतर नवा भारत कुठे आहे? हे सांगा. असा सवाल त्यांनी मोदींच्या नोटाबंदीवर उपस्थितीत केला. नोटाबंदीनंतर काय बदललं? पूर्वीचीच परिस्थिती कायम आहे, केवळ लोकांना त्रास झाला. सगळीकडे कॅश चालू आहे, कॅशलेस भारत कुठे गेला? नोटाबंदीने काय साध्य झाले, त्याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं, नोटबंदीनंतर काय बदलले? पुर्वीचीच स्थिती कायम आहेत. केवळ लोकांना विनाकारण त्रास झाला, गळीकडे कॅशलेस चालू आहे. कॅशलेस भारत गेला कुठे? असाही सवाल राज ठाकरे म्हणाले.
नाशिक महानगरपालिकेवरही केली टिका
पुढे बोलताना त्यांनी शिवसेना-भाजपावर ठाकरी शैलीत टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शी कारभारवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवसेनेवर टीका करताना त्यांनी 25 वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील कारभारवर प्रश्न उपस्थितीत केला. शिवसेने बाळासाहेबांच्या नावाचा वापर करू नये. बाळासाहेबांनी करुन दाखवलं तुम्ही त्यांसारखं काम करु शकत नाहीत असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले शिवसेने 25 वर्ष मुंबईत सत्ता उपभोगली त्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही ह्यांना प्रश्न विचारण्यासाठी राज ठाकरे भेटतो का? म्हणे राज ठाकरेंनी नाशिक महानगर पालिकेत काय केलं ? असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी नाशिक मध्ये केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा दिला.
राज ठाकरे आज दिव्यात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्याला आलेले महत्त्व पाहता मनसेच्या प्रचारासाठी राज ठाकरे येणार आहेत. शहरात त्यांची जाहीरसभा होणार आहे. दिवा पूर्वेतील प्रेरणा टॉवरजवळील एका खासगी मैदानात बुधवारी राज यांची सभा होईल, अशी माहिती मनसे सरचिटणीस राजू पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारी झालेल्या दिव्यातील सभेत मैदानावर साचलेले पाणी हा चर्चेचा विषय झाला होता.