भाजपा स्थापनादिनानिमित्त फळवाटप

0

भुसावळ । भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन व स्व. पंडित दीनदयालजी उपाध्याय जन्म शताब्दी वर्षानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.

किन्ही येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, सभापती सुनिल महाजन, कॉटन सेल सदस्य प्रमोद सावकारे, नारायण कोळी, मनोज सपकाळे आदी उपस्थित होते.