मुंबई:- विदर्भामध्ये शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या बोंडअळीच्या संकटावरून भाजपचे नेहमीच चर्चेत असलेले आमदार आशिष देशमुख यांनी सरकारला पुन्हा झापुन काढले आहे. बोंडअळीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील पुढच्या वर्षीसाठी कृषी विभाग आणि कृषीच्या विद्यापीठांमध्ये कुठलीही यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळे देशमुख यांनी कृषी विभागावर टीका केली आहे.
हे देखील वाचा
कापसाला बोंडअळी लागलीय का कृषी खात्यामध्ये बोंडअळी लागलीय? असा टोला त्यांनी लगावला आहे. एवढे नुकसान होऊनही कृषी खात्याला जाग येत नाही. राज्याचे कृषी खाते हे संवेदनहीन कृषी खाते झाले आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला. कृषी विद्यापीठ, कृषी खाते या समस्येसाठी कार्यन्वित झाले पाहिजे होते मात्र तसे झाले नाही, असेही देशमुख जनशक्तिशी बोलताना म्हणाले.