भाजप आमदार एकाच गाडीतून कर्नाटक विधानसभेकडे रवाना; विश्वासदर्शक ठरावाची मागणी

0

बंगळूर: कर्नाटकमधील राजकीय घडामोडींना दररोज नवनवीन वळण लागत आहे. कॉंग्रेस-जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान आज भाजप आमदारांकडून विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली जाणार आहे. भाजपचे सर्व आमदार एका गाडीतून विधानसभेकडे रवाना झाले आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी देखील दोन दिवसांपूर्वी सरकार सुस्थितीत असून स्वत: विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली होती.