भाजप आमदार ठरले देशातील सर्वात मोठे ‘बिल्डर’ !

0

मुंबई : बांधकाम अर्थात रियल इस्टेट व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवते. बांधकाम व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात कर उत्पन्न जमा होत असते. दरम्यान देशातील सर्वात मोठ्या बांधकाम व्यावसायिक अर्थात बिल्डर यांचे नावे जाहीर करण्यात आहे. यात देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर भाजप आमदार मंगल प्रभात लोढा ठरले आहे. आमदार मंगल प्रभात लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर ठरले आहेत. लोढा यांची संपत्ती तब्बल 31 हजार 960 कोटी रुपये इतकी आहे. श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत डीएलएफ कंपनीचे राजीव सिंह दुसऱ्या तर एम्बेसी ग्रुपचे संस्थापक जितेंद्र विरवानी तिसऱ्या स्थानावर आहेत.

हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडिया यांचा सर्वेक्षण अहवाल ‘ग्रोही हुरुन इंडिया रियल इस्टेट रिच लिस्ट 2019’ हा प्रसिद्ध झाला. या रिपोर्टमध्ये देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांची यादी जाहीर करण्यात आली.

लोढा परिवाराची एकूण संपत्ती 31,960 कोटी रुपये इतकी असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. 2019 मध्ये लोढा परिवाराची संपत्ती 18 टक्क्यांनी वाढली. शंभर जणांच्या यादीत अन्य 99 जणांपेक्षा 12 टक्के संपत्तीचा भाग एकट्या लोढांकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावरील डीएलएफचे राजीव सिंह यांची संपत्ती 25 हजार 80 कोटी रुपये आहे. यंदा त्यांच्या संपत्तीत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ते श्रीमंत व्यावसायिकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. एम्बेसी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट्सचे जितेंद्र विरवानी हे 24 हजार 750 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.