मुंबई- काल दहीहंडी उत्सवाचे घाटकोपर येथील भाजपाचे आमदार राम कदम यांनी आयोजन केले होते. भारतातील सर्वात मोठी हंडी म्हणून आयोजित केलेल्या या उत्सवामध्ये अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. मात्र याच उत्सवामध्ये आमदार राम कदम यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले.
गोविंदाना तुम्हाला पसंत असलेली मुलगी पळवून आणून तुम्हाला देणार असे वक्तव्य केल्याचे दिसते. उपस्थित गोविंदाना आपल्याशी संपर्क साधण्यासाठी कदम यांनी स्वत:चा फोन नंबर देताना हे वक्तव्य केले. कदम आपला मोबाइल नंबर देण्यास सुरुवात करतात आणि त्यानंतर स्टेजवरील समालोचक कोणतही काम असेल तर साहेबांना (राम कदम यांना) भेटू शकता असं सांगतो. ‘साहेब मी तिला प्रपोज केलं ती मला नाही म्हणतेय मला मदत करा’, या कामासाठीही मी तुमची मदत करायला तयार आहे, असे राम कदम यांनी सांगितले.
बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे !
कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित? pic.twitter.com/Z5JAx5ewrN— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 4, 2018
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून राम कदम यांचा एक व्हिडीओ ट्विट करत हा आरोप केला आहे. ‘बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे! ट्विटच्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी कदम यांच्यावर टीका केली. कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.