भाजप उमेदवार लाच देण्याबाबत बोलत असल्याचा विडीओ व्हायरल

0

नवी दिल्ली- कॉंग्रेसने कर्नाटक निवडणुकीत मुख्यमंत्री सिद्धारमया यांच्या विरोधात बादामी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असेलेले भाजप उमेदवार श्रीरामुलू यांचा एक विडीओ शेयर केला आहे. यात श्रीरामुलु हे 2010 मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया पदावरून सध्या निवृत्त असलेले के. जी. बालकृष्णन यांना आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी 160 कोटींची लाच देण्याबाबत सांगत असल्याचे दिसून येत आहे. या विडीओमध्ये श्रीरामुलु, जनार्दन रेड्डी आणि माजी चीफ जस्टिस याचे जावाई दिसून येत आहे. यावरून कॉंग्रेसने श्रीरामुलु यांच्यावर निवडणूक लढविण्यास बंदी घालावी अशी मागणी केली आहे.