भाजप कार्यकर्ते जोडणार्‍यांना तिकिट देतो!

0

जळगाव । भाजप हा पक्ष कार्यकर्ते जोडणार्‍यांना तिकिट देाते, कोटी रूपये खर्च करणार्‍यांना नाही, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी येथे केले. शासकीय दौर्‍यानिमित्त जळगावात आलेल्या मंत्री बापट यांनी आज सायंकाळी भाजपाच्या महानगर कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. निवडणुकीवेळी तिकिट वाटपात व्यवहारीक असणे महत्वाचे असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर केला.

भाजप एक कुटुंब
भाजपाच्या तुलनेत इतर पक्षात खूपच फरक असून भाजपा म्हणजे एक कुटूंब आहे. येथे सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे वावरतात. कार्यकर्ते, मंत्री, पदाधिकारी हे एकमेकांशी सलोख्याने राहतात व तसेच राहीलेही पाहीजे, हाच फरक आपल्या पक्षात व इतर पक्षात आहे. भाजपाला संपविण्याचा कित्येकांनी प्रयत्न केला, पण पक्ष संपला का असा प्रश्‍न उपस्थीत करत बापट यांनी आणीबाणीत संघाला व पक्षाला किती त्रास दिला गेला. हे सांगितले.

तिकिट वाटपात व्यावहारिक राहावे लागते!
यावेळी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मीता वाघ, जिपचे समाज कल्याण समितीचे सभापती प्रभाकर सोनवणे आदी मान्यवर उपस्थीत होते. अन्नपुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी कार्यकत्यांसोबत संवाद साधला. ते म्हण मंत्री झाल्यापासुन मि नेहमी एक पथ्य पाळत असे ते म्हणजे कोणत्याही जिल्ह्याच्या दोैर्‍यावर असतांना आगोदर तेथील स्थानीक कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांना भेटणे व साधारणातील साधारण कार्यकर्त्याच्या घरी जेवण घेणे कारण मी आज एक मंत्री असलो, तरीपण कार्यकर्ताच आहे. अनेक वर्षे मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी संघटना व आरएसएस मध्ये काम केले आहे. कार्यकर्ता जर नाराज झाला तर पक्ष संपतो, कार्यकर्त्यावरच पक्ष अवलंबून असतो. दरम्यान, स्थानिक पातळीवर नेतृत्व निर्माण व्हायला हवे. भाजपा कार्यकर्ते जोडणार्‍याला तिकीट देतो कोटी पर्यंत खर्च करणार्‍याला नाही तसेच कार्यकर्ता हा पक्षाचा जिव, आत्मा, प्राण असल्याचे त्यांनी सागितले.

माझ्या खात्यातील कोणतीही अडचण असो ती स्थानिक पातळीवर सोडवतो व नागरीकांना त्रास होऊनये याची दखल घेत असतो. रेशनकार्ड वरती नागरीकांना रेशन मिळण्यासाठी बायोमेट्रीक व आधारकार्ड योजनेच्या आधारे रेशन वाटप पारदर्शी करण्याचा प्रयत्न असून लवकारात लवकर सर्व काम सुधारणांमधून पारदर्शी करण्याचा प्रयत्न चालू असून नागरीकांना योग्य त्या सेवा देऊ तसेच रेशनदुकादाराप्रती सहानूभूतीही असल्याचे त्यांनी सांगितले. 11 लाख रेशकार्ड बोगस आढळले असून ती सर्व रद्द केली दरम्यान, यामुळे 2 लाख 50 हजार कोटी वाचल्याचे त्यांनी संगितले.