भाजप-कॉंग्रेस मिळूनही मला पराभूत करू शकणार नाही-ओवेसी

0

हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजप अध्यक्ष अमित शाहंना थेट आव्हान दिले आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी-शाहंनी माझ्याविरुद्ध हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवावी असे ओवेसीनी सांगितले आहे. एका कार्यक्रमामध्ये ओवेसींनी भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीवरून ओवेसींनी भाजप-काँग्रेसवर टीका केली. मोदी-शाहंबद्दल बोलताना ओवेसींनी काँग्रेसलाही आव्हान दिले. भाजप आणि काँग्रेसने एकत्र येऊन माझ्याविरुद्ध हैदराबादमधून लढून दाखवावे. हे दोघे मिळूनही मला हरवू शकत नाहीत, असा दावा ओवेसी यांनी केले आहे.