जळगाव । जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक मागील महिन्यात पार पडली. निवडनुकीनंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीचे वेध लागले आहे. आवश्यक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी गट नोंदणी केली आहे.
मुक्ताईनगर पंचायत समितीतील भाजपाच्या गटनेतेपदी सुवर्णा साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना नोंदणीचे पत्र देण्यात आले.