भाजप घटना बदलण्याच्या तयारीत -अशोक चव्हाण

0

जळगाव । प्रतिनिधी । बहुमताच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, अशी भावना असलेले हे मस्तवाल सरकार आहे. देशाच्या घटनेच्या मुळे गाभ्याला हात घालून स्वतःला हवी असलेली घटना लादण्याच्या प्रयत्नात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज जळगावात केला. काँग्रेसतर्फे आयोजित शिबिराचे प्रास्ताविक करताना ते बोलत होते.

खासदार चव्हाण यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ज्या राज्यात आधी प्रगतीमध्ये उच्चांक व्हायच त्या राज्यात आता आत्महत्यांचा उच्चांक होत आहे. शेतकर्‍यांप्रती हे सरकार अत्यंत असंवेदनशील असून मख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत येऊन शेतकर्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. कर्जमाफी केवळ कागदावर असून त्याची अंमलबजावणी शून्य आहे. बेरोजगारीमुळे तरूणांच्या मनात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. मनमोकळे पणाने बोलण्याची मुभा नाही असा आरोप चव्हाण यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मोकळेपणाने बोलल्यानंतर देशद्रोहाचा येथे गुन्हा दाखल होतो. मुस्कटदाबीचा प्रकार येथे सुरू आहे. मात्र, काँग्रेसने आता अधिक तीव्रतेने पुढाकर घेतला असून सामन्यांना आता खात्री पटतेय की, आपल्या प्रत्येक प्रश्‍नाला मार्गी लावण्यासाठी काँग्रेस हा एक चांगला पर्याय त्यांच्यासमोर आहे. ज्या पद्धतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्या पद्धतीने घटना वाचविण्यासाठी आम्ही बलिदान द्यायाला तयार आहोत, केवळ आश्‍वासन देणान हे फडणवीस नव्हे फसणवीस सरकार आहे. असे टीकास्त्र अशोक चव्हाण यांनी त्यांच्या प्रास्ताविकात भाजप सरकारवर सोडलेे.

जळगावात काँग्रेसने मागे घडले ते सोडून पुढे पाहायचे आहे. रोज राजकीय परिस्थिती बदलते, अशा परिस्थितीत सर्वांनी संघटीत होऊन काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार केल्यास अशक्य काही नाही, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. गुजरात निवडणुकांमध्ये मोदींना घाम फोडण्याचे काम राहुल गांधी यांनी केले असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

यांची होती उपस्थिती
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाईजी जगताप, स्मिता शाहपुरकर, माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, सेवादलचे विलास अवतरे, रामकिशन ओझा, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, पृथ्वीराज साठे, प्रभाकर सोनवणे, राजू वाघमारे, प्रवक्ते अतुल लोढ़े, विनायक देशमुख, वसंतराव पुरखे, डॉ. हेमलता पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, अ‍ॅड. संदीपभैया पाटील, डॉ.भंगळे, डॉ.राधेश्याम चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार जी.एन.पाटील, विलास अवतरे, अ‍ॅड. ललीता पाटील, रामकिशन ओझा, शाह आलम, आबा तडवी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.