भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

0

पिंपरी-चिंचवड : रहाटणी येथील स्काईलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म, टेलिव्हिजन व आर्ट येथे भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महाराष्ट्र प्रदेश भाजप चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, डॉ. प्रीती व्हिटकर, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभूवन, पिंपरी-चिंचवड महापालिका महिला व बालकल्याण सभापती सुनीता तापकीर, नगरसेविका सविता खुळे, हरेश तापकीर, केशव घोडके, सुहास निबंधे, मिलिंद दास्ताने, विश्‍वनाथ नखाते उपस्थित होते.

संघटनेला शुभेच्छा
याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेला शुभेच्छा प्रदान केल्या. कार्यक्रमाचे आयोजन भाजप चित्रपट कामगार आघाडीचे उपाध्यक्ष संतोष ओझा व केतन लुंकड यांनी केले. प्रास्ताविक संतोष चोरडिया यांनी केले. सूत्रसंचालन संदीप गोडांबे यांनी तर आभार संतोष ओझा यांनी मानले.