भाजप जिल्हाध्यक्षांवरील आरोप हे राष्ट्रवादीचे षडयंत्र

0

चाळीसगाव । भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे असून हे राष्ट्रवादीचे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप चाळीसगाव भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली असून यासंदर्भात चाळीसगाव तहसीलदार कैलास देवरे यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

चौकशीची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी हा प्रथम क्रमांचा पक्ष म्हणून सर्वच क्षेत्रात चांगले काम करीत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या पोटात दूखत असून चुकीचे व निरर्थक आरोप केले जात आहे. जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे चौकशीला सामोरे जाण्यास तयार असून योग्य ती चौकशी व्हावी व सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी निवेनदना करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृपनेश्‍वर पाटील, पं.ससदस्य सुनील पाटील, माजी पं स सदस्य दिनेश बोरसे, अ.जामोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्निल मोरे, रोहन सुर्यवंशी, किशोर रणधीर, अरूण जाधव, संतोष निकुंभ, गिरीष बर्‍हाटे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.