भाजप-जेडीयूची जोरदार मुसंडी; तेजस्वी पराभवाच्या छायेत

0

पटना : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडी-कॉंग्रेस प्रणीत आघाडी पुढे होती. मात्र आता एनडीए (भाजप-जेडीयू)ने आघाडी घेतली आहे. एनडीएला १३१ जागांवर आघाडी आहे. एनडीए जवळपास बहुमाताजवळ पोहोचली आहे. दुसरीकडे तेजस्वी आघाडीला ९५ जागांवर आघाडी आहे.

भाजप ७१, आरजेडी ६०, जेडीयू ५४, कॉंग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे.

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सुरुवातीला दोन तास महागठबंधनला आघाडी होती. एनडीए खूप पिछाडीवर होती. मात्र आता चित्र फिरले आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे दिसत आहेत.