नवी दिल्ली-दिल्ली सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यांच्यात नेहमीच वाद-विवाद सुरु असतो. भाजप सरकार दिल्ली सरकारला मदत करीत नाही किंवा विश्वासात घेऊन काम करत नसल्याचे आरोप आपकडून होत असते. दरम्यान दिल्लीतील १० लाख लोकांचे नावे मतदान यादीतून वगळण्यात आले आहे. यावरून आम आदमी पार्टीने भाजपला लक्ष केले आहे. भाजप दिल्लीकरांचे दुश्मन आहे अशा शब्दात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली आहे. ट्वीटरवरून केजरीवाल यांनी आरोप केले आहे.
भाजपा बहुत बड़े स्तर पे दिल्ली के लोगों के वोट कटवा रही है। भाजपा दिल्ली वालों की दुश्मन है। https://t.co/eEApzoXpSc
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 4, 2018
मतदान यादीतून १० लाख नावे वगळण्यात आले आहे. निवडणूक आयोग देखील भाजपची ‘बी’ टीम आहे असे आरोप ‘आप’ने केले आहे.