जळगाव : शहरातील मयुर कॉलनीत भाजप नगरसेवकाच्या घरी सुरू असलेल्या जुगारावर मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता पोलीस उपअधीक्षकांनी छापा टाकला. या कारवाईत बारा जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन १२ मोबाईल, तीन दुचाकींसह एकुण २ लाख ७४ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते . कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनी येथे कुलभूषण पाटील यांच्या नवीन घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी किरण धमके सुनील पाटील, राजेश चौधरी रवींद्र मोतीराया, अशोक फुसे सचिन साळुंके ,विनयकुमार देसले व पंकज शिंदे यांना सोबत घेत छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी संतोष बारी, रुघुनाथ पाटील, समाधान चौधरी, पंकज पाटील, सचिन पाटील नीलेश कोळी, धिरज पाटील, राजेंद्र भोई, मंगेश पाटील, पंकज पाटील, कुणाल रामसे व अनिल गव्हाळे यांना ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले .